अखेर खातेवाटप जाहीर, अजित दादांना वित्त खाते, सहकार ही राष्ट्रवादीकडे…
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेले बारा दिवस बहुप्रतिक्षित असलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज जाहीर झाले असून अपेक्षेनुसार अजित दादांना वित्त आणि नियोजन खाते मिळाले असून सहकार खाते दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले आहे.Finally, allocation of accounts is announced, finance account to Ajit Dada, cooperation to NCP…
तब्बल बारा दिवसांनी बरेच चर्चेत राहिलेले खाते वाटप आज राज्यपालांच्या मान्यतेने मुख्यमंत्र्यानी जाहीर केले आहे, त्यांनी आपल्याकडे सामाजिक न्याय, परिवहन , नगरविकास आदी खाती स्वतःकडेच ठेवली असून आपल्याकडील सार्वजनिक उपक्रम हे खाते दादा भुसे यांना दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडील वित्त आणि नियोजन खाते अजित पवारांना दिले असून , स्वतःकडे गृह, विधी – न्याय, ऊर्जा , जलसंपदा ही महत्त्वाची खाती ठेवली आहेत तर स्वतःकडील गृहनिर्माण खाते अतुल सावे यांना सोपविले आहे .
सहकार हे महत्त्वाचे खाते दिलीप वळसे पाटील यांना, छगन भुजबळ यांना अन्न, नागरी पुरवठा, धनंजय मुंडे यांना कृषी , धर्माराव अत्राम यांना अन्न, औषध प्रशासन, अनिल पाटील यांना मदत – पुनर्वसन , आदिती तटकरे यांना महिला – बालविकास , हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण तर संजय बनसोडे यांना क्रीडा , युवक कल्याण खाते मिळाले आहे.
आधीच्या मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आले असून अब्दुल सत्तार यांना कृषी ऐवजी अल्पसंख्याक आणि औकाफ , गिरीश महाजन यांना पर्यटन – ग्रामविकास , मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास, संजय राठोड यांना जलसंधारण अशी खाती मिळाली आहेत,बाकी मंत्र्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत.
ML/KA/PGB
14 July 2023