लाडकी बहीण योजनेवर येणार चित्रपट, मुख्य भूमिकेत गौतमी पाटील

 लाडकी बहीण योजनेवर येणार चित्रपट, मुख्य भूमिकेत गौतमी पाटील

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर आता मराठी चित्रपट येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा साताऱ्यात मुहूर्त पार पडला. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. या चित्रपटाची कथा राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ या उपक्रमावर आधारलेली असणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून, त्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. याच प्रेरणादायी योजनेवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. समाजोपयोगी विषयावर आधारलेला हा चित्रपट केवळ माहितीपर नसून, तो संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाने परिपूर्ण असा अनुभव देईल, असे निर्मात्यांनी सांगितले. चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रॉडक्शन यांनी एकत्रित केली आहे. शीतल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद शीतल शिंदे हिने केले, तर गणेश शिंदे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आतापर्यंत या योजनेचा लाभ असंख्य महिलांनी घेतला आहे. गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘लाडकी बहीण’ हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *