शाह बानो प्रकरणावर आधारित चित्रपट अडकला वादात
मुंबई, दि. ३ :
यामी गौतम आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हक’ हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट शाह बानो प्रकरणावर आधारित आहे, ज्याने १९७० च्या दशकात मुस्लिम महिलांच्या हक्कांची मागणी करून राष्ट्रीय चर्चेला सुरुवात केली होती. शाह बानोच्या मुलीने आता इंदूर उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. लवकरच यावर सुनावणी होईल.
शाहबानोची मुलगी सिद्दीका बेगम खान यांचे वकील तौसिफ वारसी यांनी याचिकेत म्हटले आहे की, हा चित्रपट मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावेल आणि हा चित्रपट शरिया कायद्याची नकारात्मक प्रतिमा सादर करतो. याचिकेत असेही म्हटले आहे की, निर्मात्यांनी शाहबानोवर चित्रपट बनवण्यापूर्वी तिच्या कायदेशीर वारसाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
याचिका दाखल केल्यानंतर, चित्रपटाचे दिग्दर्शक सुपरन एस. वर्मा, निर्मिती भागीदार, प्रमोटर आणि चित्रपटाला प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
SL/ML/SL