वीज ग्राहकांचे मीटर काढून नेणाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करा

 वीज ग्राहकांचे मीटर काढून नेणाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करा

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वीज ग्राहकांशी अरेरावी व जबरदस्ती करून विजेचे मीटर काढून नेणाऱ्या बेस्ट व अदानी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर विद्युत अधिनियम कायद्या अंतर्गत कलम 136 नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.File a case of theft against those who remove meters from electricity consumers

महावितरणने 2023-24 साठी 37 टक्के वीज दरवाढीचा कंबरतोड प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ज्यामुळे आजच देशातील सर्वात जास्त दर असणाऱ्या महाराष्ट्रातील ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना 4०० ते 8०० रुपयांपर्यंत अतिरिक्त झटका बसणार आहे तर 300 युनिट पेक्षा जास्त वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना 8०० ते 17०० रुपयांपर्यंत दरवाढ सोसावी लागणार आहे. व्यापारी , छोटे उद्योजक यांनाही मोठी झळ बसणार आहे तर मोठ्या उद्योगांनाही जवळपास 30 टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. यातून नवीन उद्योग महाराष्ट्रात येणं तर सोडाच, आहेत तेही महाराष्ट्रातून पळ काढण्याची भिती आहे. व्यापारी व औद्योगिक दरवाढीचा अंतिम भार सामान्य माणसालाच झेलावा लागत असल्याने आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाचे कंबरडे मोडणार आहे.
या प्रस्तावित दरवाढीला ऑन लाईन पध्दतीने 15 फेब्रुवारी पर्यंत www.merc.gov.in/e-public-consultationया संकेतस्थळावर हरकती नोंदवता येणार आहेत .त्याचा उपयोग करुन मोठ्या संख्येने या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन आम आदमी पार्टी, मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हास यांनी आज मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत आम आदमी पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष संदीप कटके उपस्थित होते.

ML/KA/PGB
31 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *