उद्यापासून महिनाभर फिफा फुटबॉल विश्वचषक
दोहा,कतार, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील फुटबॉल रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २० नोव्हेंबर उद्या (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता) दोहा येथील अल बायत स्टेडियमवर रंगणार आहे. या निमित्ताने मध्यपूर्वेच्या देशात पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक प्रथमच आयोजित केला जात आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत. Fifa football world cup for a month from 20th Nov