मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना मिळणार विक्रीच्या जागा

 मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना मिळणार विक्रीच्या जागा

मुंबई दि ६ : मुंबईत २०१४ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र असलेल्या फेरीवाल्याना यासंदर्भात सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन बाबींचा निर्णय येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले, यावर त्याचं अनुपालन करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या जातील असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

२०१४ च्या सर्वेक्षणात ३२,४१५ फेरीवाले पात्र ठरले होते मात्र नगर विक्रेता समिती गठीत न झाल्यानं त्यांना विक्रीच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत याबाबतची लक्षवेधी सूचना रईस शेख यांनी उपस्थित केली होती त्यावर अमित साटम, अस्लम शेख, अमीन पटेल आदीनी उपप्रश्न विचारले.

न्यायालयात याबाबत याचिका दाखल असून त्याची अंतिम सुनावणी झाली असून निर्णय अपेक्षित आहे अशी माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली. पात्र फेरीवाल्यांना जागा उपलब्ध दिल्या नाहीत हा अन्याय करणारे आहे असं अध्यक्ष यावेळी म्हणाले, आता त्यांना तात्पुरत्या जागा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवासी संघटना यांना विश्वासात घेऊन त्या देण्यात याव्यात अशा सूचना देखील अध्यक्षांनी दिल्या.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *