फेरबंदर येथील रस्त्यांवर खड्डेचं खड्डे
मुंबई, दि ९
भायखळा पूर्व येथील म्हाडा कॉलनी परिसरात फेरबंदर येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे एवढे मोठे आहेत की रात्रीच्या वेळी हे खड्डे न दिसल्याने दुचाकी चालकांच्या अपघातात वाढ होत आहे. तसेच या खड्यात पाणी साचून कपडे खराब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या ठिकाणी म्हाडा सारखी मोठी लोकसंख्या असलेली वसाहत आहे. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी देखील या ठिकाणावरून ये जा करत असतात. त्यांना देखील या खड्ड्यांचा रोज सामना करावा लागत आहे. तरी ही खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि पादचारी करत आहेत.
आम्ही एखाद्यांबाबत महापालिका प्रचाराला कळवले असून लवकरात लवकर खड्डे बुजवली जातील अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष किरण टाकले आणि महेशदादा थोरात यांनी दिली.KK/ML/MS