पुद्दुचेरी आणि तामिळनाडूला धडकणार फेंगल वादळ

विशाखापट्टणम, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले फेंगल वादळ आज संध्याकाळपर्यंत तामिळनाडूतील पुद्दुचेरीमधील कराईकल आणि महाबलीपुरम जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० किमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.त्यामुळे आज सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. मात्र, 28 नोव्हेंबरपासून किनारपट्टी भागात पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाल्याने वादळाचा प्रभाव दिसू लागला.मान्सूननंतरच्या काळात भारताला प्रभावित करणारे हे दुसरे वादळ आहे. यापूर्वी ऑक्टोबरच्या अखेरीस दाना वादळ आले होते.
भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार फेंगल चक्रीवादळ हे शनिवारी सकाळी साडे आठ वाजता चेन्नईच्या अंदाजे ११० किमी अग्नेय आणि पद्दुचेरीच्या १२० किमी पूर्व-इशान्येस होते. दरम्यान दक्षिणेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ आज रात्री रात्री कराईकल आणि ममल्लापुरमच्या दरम्यानचा समुद्र किनारा ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
SL/ ML/SL
30 Nov. 2024