महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या

 महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या

छत्रपती संभाजीनगर मधील वैजापुरमधून एक भयंकर बातमी समोर येत आहे. वैजापुरमध्ये एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर वैजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकार हभप संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना जमिनीचा वाद किंवा चोरीच्या उद्देशाने हत्याचा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जमिनीच्या वादावरून यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जमिनीच्या वादाच्या दिशेनेही पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *