पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला ठेवा स्वच्छ

 पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला ठेवा स्वच्छ

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिकपाळीच्या काळात अनेक मुलींना या दिवसात स्वतःला कसे स्वच्छ ठेवावे हे माहित नसते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची जास्त गरज असते, अन्यथा तुम्हाला संसर्ग पसरू शकतो. अशा परिस्थितीत पावसाळा असेल तर स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या हंगामात संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते

बहुतेक स्त्रिया एकच नॅपकिन बराच काळ वापरतात जे योग्य नाही. त्यामुळे दर तीन ते चार तासांनी नॅपकिन बदलावे. मासिकपाळी दरम्यान महिला प्रायव्हेट पार्टवर सामान्य साबण वापरतात, जे योग्य नाही. यामुळे नैसर्गिक पीएच पातळी बिघडू शकते. मासिक पाळीमुळे तुमचा प्रायव्हेट पार्ट आधीच खूप ओला असतो आणि पावसामुळे हवामानात देखील ओलावा कायम असतो.

अशा परिस्थितीत जेव्हा महिला शौचालयात गेल्यावर किंवा पाणी वापरल्यानंतरही तो भाग कोरडा करत नाहीत, तेव्हा ओलेपणा आणखी वाढतो. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही टॉयलेटला जाल तेव्हा टिश्यू पेपरच्या साहाय्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडा करा आणि मग पॅड वापरा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. यानंतर टिश्यू पेपरच्या साहाय्याने तो भाग नीट वाळवा आणि पॅड घ्या.

पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान अशा प्रकारे स्वतःला ठेवा स्वच्छ

ML/ML/PGB
22 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *