आयएसबीअँडएम पुणे येथे आंतरराष्ट्रीय एफडीपीचे आयोजन

 आयएसबीअँडएम पुणे येथे आंतरराष्ट्रीय एफडीपीचे आयोजन

पुणे, दि २२: इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया (ISB&M), पुणे येथे “उत्कृष्ट दर्जाचे संशोधन डिझाईनिंग व पब्लिशिंग” या विषयावर आंतरराष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) 2025 पार पडला. संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार व डॉ. अरुण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित या चार दिवसीय हायब्रीड कार्यक्रमात ६५ हून अधिक संशोधक सहभागी झाले.

या कार्यक्रमात डॉ. मीना बेईगी (साउथॅम्प्टन बिझनेस स्कूल, यूके), डॉ. रमाधार सिंह, डॉ. प्रवीण कुमार (बार्कलेज इंडिया) यांच्यासह आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांनी संशोधन पद्धतीशास्त्र, डेटा अ‍ॅनॅलिटिक्स, Smart PLS, SPSS, बिब्लियोमेट्रिक्स व मेटा-अ‍ॅनॅलिसिस यावर मार्गदर्शन केले.

डॉ. अरुण जोशी यांनी सांगितले की एफडीपीचा उद्देश “जिज्ञासा-केंद्री संशोधन संस्कृती विकसित करणे” हा आहे. तर डॉ. प्रमोद कुमार म्हणाले, “एक प्रभावी पीजीडीएम संस्था दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व शैक्षणिक उत्कृष्टतेतून उद्याचे जागतिक बिझनेस लीडर्स घडवते. हे एफडीपी त्या ध्येयाचे प्रतीक आहे.”KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *