सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीए कार्यालयात मिठाई उत्पादक व वितरकांसोबत बैठक

 सणाच्या पार्श्वभूमीवर एफडीए कार्यालयात मिठाई उत्पादक व वितरकांसोबत बैठक

मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क):

गणेशोत्सवापाठोपाठ येणारा दसरा, दिवाळी व नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई विभागीय कार्यालयामार्फत आज मुबंईतील एफडीए कार्यालयात मुंबई विभागातील मिठाई , मावा उत्पादक व वितरकांची मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.या बैठकीत ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाई विक्री करण्यात यावी,अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी संबंधितांनी कोणती खबरदारी घ्यावी तसेच अन्नसुरक्षा व मानदे कायदा व नियमानुसार या विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन न करण्याबाबत अन्न व्यवसायिकांना सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीला 30 ते 40 अन्न व्यावसायिक उपस्थित होते .या सर्व अन्न व्यवसायिकांना अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त (मुख्यालय ) उल्हास इंगवले, सहाय्यक आयुक्त (अन्न),सचिन जाधव , गिरीश लिंबूरकर व महेश चौधरी, सह आयुक्त (अन्न ) यांनी मार्गदर्शन केले, यावेळी मिठाई उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जैन व इतर पदाधिकारी हे उपस्थित होते.तसेच अन्न व औषध कार्यालयातील सहाय्यक आयुक्त (अन्न)आर डी पवार , ज्ञानेश्वर महाले , श्रीमती अश्विनी रांजणे ,श्रीमती नसरीन मुजावर व अन्नसुरक्षा अधिकारी एस एस सावंत आदीं उपस्थित होते.

SW/ ML/ SL

6 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post