सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी यांचं निधन

 सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीबी यांचं निधन

थिरुवनंतपुरम, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी (Fatima Beevi) यांचं आज वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधीक खासगी रुग्णालयात निधन झाले.फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी फातिमा बीवी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, फातिमा बीवी या एक बहाद्दुर महिला होत्या. त्यांच्या नावावर आजवर कित्येक रेकॉर्ड नोंदवण्यात आलेत. त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिलं आहे की, दृढ इच्छाशक्तीवरुन कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते.

फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी रोजी केरळ मधल्या पतनमतिट्टा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मीर साहिब, तर आईचे नाव ख़दीजा बीबी आहे.फातिमा बीवी यांनी त्रिवेंद्रम येथून बी.एस.सी.ची आणि तिरुवनंतपुरम या शहरातून बी.एल. ही पदवी घेतली.

6 ऑक्टोंबर 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्याची निवड झाली. भारतातून एवढ्या मोठ्या पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या पहिल्या महिला होत्या.29 एप्रिल 1992 रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. दरम्यान त्यांनी 1997 ते 2001 या काळात तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिलं.

SL/KA/SL

23 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *