विक्रोळीत छत कोसळून बापलेकांचा मृत्यू

 विक्रोळीत छत कोसळून बापलेकांचा मृत्यू

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून वडील आणि दहा वर्षे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागेश रेड्डी (३८) आणि रोहित रेड्डी अशी मृत्युमुखी पडलेल्या या दोघा बापलेकांची नावे आहेत.

विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीजवळ नागेश रेड्डी हे सुरक्षारक्षकाचे काम करतात. रविवारी रात्रीही ते नेहमीप्रमाणे कामावर असताना त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा रोहित रेड्डी तेथे गेला होता. त्याचवेळी जोरात पाऊस आल्याने दोघेही तेथील छज्जाखाली उभे होते. त्याचवेळी अचानक छज्जाचा काही भाग दोघांच्या अंगावर कोसळला. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, दोघाना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. याबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

SW/ML/SL
10 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *