पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर बुधवारी सकाळी एका व्यक्तीकडून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. ही घटना घडली तेव्हा सुखबीर सिंग बादल हे त्यांना मिळालेल्या धार्मिक शिक्षेमुळे अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर सेवादार म्हणून सेवा करत होते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या सावधगिरीमुळे सुखबीर सिंग बादल हे थोडक्यात बचावले. या घटनेनंतर हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून हल्लेखोराचे नाव नारायण सिंग चौरा असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.