अंजनगाव दर्यापुर मार्गावर भीषण अपघात. 5 जण ठार

अमरावती, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यात अंजनगावसुर्जी ते दर्यापुर मार्गावर लेहगाव फाट्यावर काल रात्री भीषण अपघात झाला. आयसर ट्रक आणि टाटा एस वाहन आमने सामने भिडल्याने झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील पाच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.Fatal accident on Anjangaon Daryapur road. 5 people killed
सर्व जण दर्यापुर तालुक्यातील बाभळी या गावातील रहिवासी
मृतका मध्ये 2 लहान मुले 2 महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि दर्यापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा तपास खल्लार पोलीस स्टेशन करत आहे.
ML/KA/PGB
24 May 2023