15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass

मुंबई, दि. १३ : १५ ऑगस्टपासून केंद्र सरकार वार्षिक FASTag सुरू करणार आहे. या नवीन नियमामुळे टोल प्लाझा ओलांडणे आणखी सोपे होईल. ही FASTag annual pass योजना प्रामुख्याने कार, जीप आणि व्हॅन सारख्या खाजगी वाहनांसाठी लागू होईल. त्यात जड व्यावसायिक वाहनांचा समावेश नाही. वार्षिक फास्टॅगसाठी तुम्हाला ३००० रुपये रिचार्ज करावे लागतील. यामध्ये २०० फेऱ्या मोफत मिळतील.
सामान्यत: वाहनाच्या वजनानुसार टोल प्लाझावर १०० ते २०० रुपये शुल्क आकारले जाते, परंतु ३००० रुपयांचा FASTag annual pass घेतल्यावर एका फेरीचा खर्च फक्त १५ रुपये असेल. या योजनेमुळे लोकांचे पैसे वाचतीलच शिवाय टोल प्लाझा ओलांडणेही सोपे होईल.
वार्षिक FASTag पास मिळविण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे नवीन FASTag खरेदी करण्याची आवश्यकता नाही. फक्त विद्यमान FASTag अपडेट करा. ते सक्रिय करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्रवास अॅप किंवा NHAI वेबसाइटवर जा.
SL/ML/SL