फॅशन डिझायनर रोहीत बल यांचे निधन

 फॅशन डिझायनर रोहीत बल यांचे निधन

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 63 वर्षीय काश्मिरी फॅशन डिझायनर रोहित बल यांचे काल निधन झाले.यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या. बल हे दीर्घकाळापासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. 2010 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टीही झाली होती.

अनोख्या शैली आणि सर्जनशीलतेसाठी जगभरात प्रसिद्ध होते. ते विशेषतः पारंपारिक भारतीय सौंदर्यशास्त्र आणि आधुनिक डिझाइन्सचे मिश्रण करण्यासाठी प्रसिद्ध होते. या कामामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. बल यांच्या कलेक्शनमध्ये अनेकदा क्लिष्ट भरतकाम आणि आलिशान फॅब्रिक्सचा वापर केला जात असे. या कपड्यांनी भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रीमंत उमरा ग्राहकांना आकर्षित केले. या यशातून त्यांना मोठा आर्थिक लाभ तर झालाच, शिवाय देश-विदेशातही त्यांचे नाव गाजले

रोहित बलचा जन्म काश्मीरमधील श्रीनगर येथे झाला. दिल्लीतील प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. तेथून त्यांनी इतिहासात ऑनर्स घेऊन पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते आपल्या कुटुंबाच्या निर्यातीच्या व्यवसायात सामील झाला. काही दिवस कौटुंबिक व्यवसायात काम केल्यानंतर त्यांनी 1980 च्या उत्तरार्धात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. गेल्या काही वर्षांत त्यांनी भारतीय फॅशन जगतात एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *