शेतकऱ्यांनी पावसासाठी घातले वरुण देवाला साकडे

वाशिम, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसासाठी वाशिम जिल्हयातील पार्डी ताड येथील ग्रामस्थांचे धोंडी मागून वरूण राजाला साकडे घातले आहे. Farmers worship God Varun for rain कमरेला लिंबाचे डहाळे बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे, दाय दाणा पिकू दे’ च्या जयघोषात वरूणराजाकडे पावसाची त्यांनी प्रार्थना केली.
पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी संपला तरी जिल्हयात कुठेही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. दरम्यान लांबणीवर गेलेल्या पावसामुळे वाशिम जिल्हयातील खरीपातील ८० टक्के पेरण्या रखडल्या आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामस्थांनी धोंडी मागून वरूण राजाला साकडे घातले आहे. यावेळी जुन्या रूढी परंपराना उजाळा देत गावातील नागरीकांनी कमरेला लिंबाचे डहाळे बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे दे दाय दाणा पिकू दे’ अशा स्वरूपात वरूण राजाकडे पावसासाठी साकडे घालण्यात आले.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही ग्रामीण भागात पावसाला प्रसन्न करण्यासाठी जुन्या रूढी परंपराचे पालन केल्या जात आहे असे दिसून येते.
ML/KA/PGB
2 July 2023