शेतकऱ्यांना मिळणार AI ची साथ

 शेतकऱ्यांना मिळणार AI ची साथ

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) भारतातील शेतीवर होणारा मोठा परिणाम यावर भाष्य केले आहे. सत्या नडेला यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये छोट्या शहरांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्टोरी सांगितली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. नडेला यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एआयने महाराष्ट्रातील बात्तीस शिराळा येथील एका लहान शेतकऱ्याला पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी, रासायनिक वापर कमी करण्यासाठी आणि पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी कसे मार्गदर्शन केले आहे, हे या व्हिडिओत आहे. शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव विलक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्हिडिओवर कमेंट करताना एलन मस्क यांनी लिहिले की, “एआय सर्व काही चांगले करेल.” 2022 मध्ये मायक्रोसॉफ्टने अ‍ॅग्री टेक ट्रस्टच्या (ADT) सहकार्याने बारामतीत कृषी तंत्रज्ञान प्रकल्प सुरू केला. हा उपक्रम शेतकऱ्यांना निरोगी आणि मजबूत पिके घेण्यास मदत करण्यासाठी एआय साधनांचा वापर करतो.

SL/ML/SL

25 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *