शेतकऱ्यांना मिळणार कार्बन क्रेडिटचा मोबदला
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण संतुलन अबाधित राखण्यासाठी महोगनी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा मोबदला मिळणार आहे. मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिरिंग सर्विसेस लिमिटेड, मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन्स व महोगनी विश्व ॲग्रो लिमिटेडच्या पुढाकाराने हे काम होत आहे.
महोगनी कृषि-वानिकी हा प्रकल्प सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगण आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापुढेही शेतकऱ्यांना विविध पिकांद्वारे कार्बन क्रेडिट उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न सुरू आहे. मिटकॉन पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या विकासासाठी कृषी वनीकरण पद्धती आदर्श ठरते. शेतकरी बंधूंच्या सहकाऱ्याने व्यावसायिक तत्त्वावर सहा हजार एकरांवर महोगनी लागवड करण्यात आली आहे. मिटकॉनचा भारतातील महोगनी वृक्ष लागवड हा उपक्रम आंतरराष्ट्रीय स्वच्छ विकास यंत्रणा कार्यपद्धतीचे पालन करत आहे. मिटकॉनने जागतिक वृक्ष आधारित कार्बन क्रेडिट मार्केटमध्ये सहभागी होऊन शेतीचा शाश्वत विकास व शेतकरी आर्थिक सक्षमीकरणाचा पर्याय उपलब्ध केला आहे.Farmers will get compensation of carbon credit
ML/KA/PGB
25 Nov 2023