Farmer ID शिवाय शेतकरी या योजनांपासून राहणार वंचित

 Farmer ID शिवाय शेतकरी या योजनांपासून राहणार वंचित

मुंबई, दि. ७ : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा Farmer ID न काढल्यास भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच Farmer ID काढणे अत्यावश्यक ठरणार आहे. Farmer ID ऑनलाइन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून काढता येते. आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.

Farmer ID हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा एक ओळख क्रमांक आहे. आधार, सातबारा उतारा, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक यांच्याशी हा ID जोडलेली असते. या ओळखीच्या आधारे शेतकऱ्याची जमीन, पीक, पीक पद्धत आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवला जातो. शासनाच्या मते, यामुळे योजनांचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे.

  • या योजनांसाठी Farmer ID अनिवार्य

पीएम किसान योजना,

पीक विमा योजना महाडीबीटीवरील अनुदान

योजना कर्ज व व्याज सवलत योजना,

नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई

पीक खरेदी व हमीभाव योजना

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *