शेतकऱ्यांनी धरली सेंद्रीय शेतीची कास, उभारली बांधावरील प्रयोगशाळा

 शेतकऱ्यांनी धरली सेंद्रीय शेतीची कास, उभारली बांधावरील प्रयोगशाळा

वाशिम, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली असून विषमुक्त शेतीसाठी शेत बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारली आहे.

वाढत्या रसायनाचा शेतीवर आणि पर्यायाने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असून रासायनिक शेतीला बगल देउन सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आता काळाची गरज झाली आहे. नेमकी हीच बाब ओळखून वाशिम जिल्ह्यातील बाभुळगाव येथील शेतकरी भागवत ढोबळे यांनी शेत बांधावर जैविक प्रयोगशाळा उभारून गावाबरोबरच परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याची किमया साधली आहे.

डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अकोला अंतर्गत स्थापित योगायोग जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी आणि मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत शेत बांधावरील प्रयोगशाळा या नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत सुरू केलेल्या या प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावतचं जैविक निविष्ठा उपलब्ध होत आहेत.
दरम्यान,कृषी क्षेत्रातील या अभिनव प्रयोगामुळे वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल विषमुक्त शेतीकडे वाढण्यास चालना मिळणार आहे.

शेतीत विविध पिकांचे उत्पादन घेत असतांना कराव्या लागणाऱ्या अवाढव्य उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र सुधारून कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा त्यांना व्हावा या करीता वाशिम जिल्ह्यात फार्म लॅब अर्थात बांधावरील प्रयोगशाळा ही संकल्पना राबविण्यात येत असून या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात जैविक निविष्ठांची निर्मिती करण्यात येत आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांकडून संचालित होत असलेल्या २० प्रयोगशाळा जिल्ह्यात कार्यरत असून यामधून निर्माण होत असलेल्या निविष्ठांचा उपयोग शेतकरी करत आहेत.

कृषी विभागाने केले सहाय्य

दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकरी मेटाकुटीस आले असून रासायनिक खते आणि किटनाशकाच्या सततच्या वापराचे प्रतिकूल परिणाम शेतजमिनीच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून फार्मलॅब अर्थात शेतीच्या बांधावरील प्रयोगशाळा ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात सर्वप्रथम प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गटांना प्रशिक्षित करण्यात आले असून याच तज्ञ संचालकांच्या मार्फत या प्रयोगशाळांचे कामकाज चालविण्यात येत आहे.
या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विविध जिवाणू खते, जैविक कीटकनाशके, ट्रायकोडर्मा, बियाण्यास बीज प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त असलेले रायझोबियम या सारख्या निविष्टांची निर्मित करण्यात येते.

घरगुती पध्दतीने तयार होणाऱ्या या दर्जेदार निविष्ठांचा खर्च बाजारात मिळणाऱ्या निविष्ठांच्या तुलनेत फारच कमी असून या जैविक निविष्ठांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होण्यास मदत होत आहे. या अभिनव प्रयोगामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस हातभार लागला आहे. Farmers took up organic farming, set up a laboratory on the dam

ML/KA/PGB
31 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *