या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकरी १२ हजार रुपये
हैदराबाद, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. रयतु भरोसा योजनेतून तेलंगणा शेतकऱ्यांना वर्षाला प्रतिएकर १२ हजार रुपये मदत देणार आहे. राज्यातील सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी ही मदत दिली जाणार आहे. तसेच भुमिहीन शेत मजुरांनाही इंदिराग्मा आत्मीया भरोसा योजनतून वर्षाला १२ हजार रुपये दिले जाणार आहेत. या महिन्यापासून म्हणजेच २६ जानेवारीपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. तसेच कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना ही मदत देण्यात येईल, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेतंथ रेड्डी यांनी सांगितले.
तेलंगणा सरकारने नव्या वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय नुकतेच जाहीर केले. त्यातील महत्वाचा निर्णय म्हणजे रयतु भरोसा योजनेतून शेतकऱ्यांना देण्यात येणारा निधी वाढवण्यात आला. सध्या या योजनेतून शेतकयांना एकरी १० हजार रुपये मिळतात, आता या मदतीत २ हजारांची वाढ करण्यात आली. आता शेतकऱ्यांना एकरी १२ हजार रुपये मिळतील. महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये देण्याची मागणी केली जात आहे. मात्र तेलगणा सरकारने आधीच ही योजना सुरु केली आणि आता रकमेतही वाढ केली आहे.
SL/ML/SL
6 Jan. 2025