शेतकरी प्रोत्साहन योजनेतील पैसे आता ऑफलाईन सुद्धा

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दोन लाखांपर्यंत कर्ज भरणाऱ्या शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजारांची रक्कम ३१ मार्च पर्यंत देण्यात येईल, ऑनलाईन पैसे शक्य नसेल तर लाभार्थ्याला प्रत्यक्ष बँकेत बोलावून खात्री करून पैसे द्या अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार, पणन विभाग मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना दीपक चव्हाण यांनी उपस्थित केली होती, त्याला देवराव होळी, प्रकाश आबिटकर, बाळासाहेब पाटील आदींनी उप प्रश्न विचारले. या योजनेतील ८० टक्के शेतकऱ्यांना पैसे देऊन झाले आहेत, उर्वरित सगळ्यांना ते दिले जातील असं मंत्री म्हणाले.Farmers’ Incentive Scheme money is now offline too
दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना असा लाभ देण्यासाठी महा विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ उप समितीने वित्त विभागाची परवानगी घेतली नाही म्हणून तो प्रस्ताव प्रलंबित आहे, आम्ही त्याची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करू असं ही मंत्री सावे म्हणाले.
सोलापूरला फायर पंपिंग स्टेशन
सोलापूर औद्योगिक वसाहतीत असणारे फायर पंपिंग स्टेशन उभारण्यासाठी धोरण येत्या वर्षभरात तयार करण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सुभाष देशमुख यांनी उपस्थित केली होती.
या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी संबधित विभागाला सूचना दिल्या जातील असं ही मंत्री म्हणाले.
यावेळी उत्तरे देण्यासाठी संबधित मंत्री उपलब्ध नसल्याने सभागृहाचं कामकाज दहा मिनिटे तहकूब करावे लागले होते.
ML/KA/PGB
14 Mar. 2023