शेतकऱ्यांनी अडविला मंत्र्यांचा ताफा
औरंगाबाद, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात कृषी मंत्री व पालक मंत्री याच्या गाड्यांचा ताफा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला.
सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसून त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालक मंत्री संदिपान घुमरे या मंत्र्यांचा ताफा अडवून जोरदार घोषणा बाजी करत ऊस उत्पादक शेतकर याकडे सरकारने लक्ष द्यावे व शेतकऱ्याचे विविध मागण्या मान्य करावी अशी मागणी केली.
सरकारने लक्ष दिले नाही तर तीव्र संघर्षाला सामोरा जावा लागेल. असा इशारा औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे यांनी या मंत्र्यांना दिला.
ML/KA/SL
19 Nov. 2022