मावळत्या राज्यपालांना दिला निरोप
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे राजभवनात गेले होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच राहील असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना पुष्पगुच्छ तसेच श्री गणेशाची प्रतिमा भेट म्हणून देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले.Farewell to the outgoing governor
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर तसेच राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ML/KA/PGB
17 Feb. 2023