विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेतील १५ सदस्यांच्या निवृत्तीनिमित्त विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पुनरागमन झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले.
विधानपरिषदेतील १५ सन्मानीय सदस्यांचा कालावधी समाप्त होणार आहे. ज्यामध्ये विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील, अनिल परब, महादेव जानकर, डॉ.मनिषा कायंदे, विजय गिरकर,अब्दुल्ला खान, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ.मिर्झा अथर,डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील या सर्व सदस्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी ७ जुलै आणि २७ जुलै रोजी समाप्त होणार आहे. यावेळी विधानपरिषदेच्या निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी विधानभवनासमोर त्यांचे छायाचित्र घेण्यात आले.
ML/ML/SL
5 July 2024