प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

 प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना पद्मभूषण डॉ. कनक रेळे (८५) यांचे आज मुंबई येथे राहत्या घरी निधन झाले. केरळमधील आता लुप्त होत जाणारे मोहिनीअट्टम आणि कथकली या शास्त्रीय नृत्यप्रकारांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. मोहिनअट्टम या नृत्यप्रकारात संशोदन करून त्यांनी पीएचडी मिळवली.

१९६६ मध्ये त्यांनी मुंबईत नालंदा डान्स अँड रीसर्च सेन्टर आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना केली. सर्वसामान्य घरातल्या नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी या संस्थांचं शुल्कही कमी ठेवलं होत. कनक रेळे यांना पद्मभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आलं आहे.

पौराणिक कथेत नेहमीच दुय्यम महत्त्व दिल्या गेलेल्या व वेळप्रसंगी बंडखोरी करणाऱ्या पात्रांना शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून बोलते करण्याचे श्रेय ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्रा’च्या संस्थापिका व संचालिका डॉ. कनक रेळे यांच्याकडे जाते. महाभारतातील अंबा, द्रौपदी व गांधारी या व्यक्तिरेखांवर झालेला अन्याय त्यांनी देशविदेशांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. २०१६ साली या पात्रांमध्ये एकलव्य व नंदनार यांची भर पडली आहे.

SL/KA/SL

22 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *