प्रसिद्ध चित्रकार आणि कवी इमरोज यांचे निधन

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज (९७) यांचे निधन झाले. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग होते. अमृता प्रीतमसोबतच्या नात्यानंतर इमरोज लोकप्रिय झाले. दोघांनी लग्न केले नसले तरी ते ४० वर्षे एकमेकांसोबत राहिले.
इमरोज यांचा जन्म 1926 मध्ये लाहोरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात झाला. इमरोज यांनी जगजीत सिंग यांच्या ‘बिरहा दा सुलतान’ आणि बीबी नूरनच्या ‘कुली रह विचार’सह अनेक प्रसिद्ध एलपीचे पहिले पान डिझाइन केले होते.
इमरोज आणि अमृता यांची प्रेमकहाणी खूप प्रसिद्ध आहे. अमृता आणि इमरोज यांच्या वयात सात वर्षांचा फरक होता. 2005 मध्ये अमृताचे निधन झाले. मृत्यूपूर्वी अमृताने इमरोजसाठी ‘मैं तुम्हें फिर मिलूंगी’ अशी कविता लिहिली होती.
इमरोज तिच्या मृत्यूनंतर कवी बनला. त्यांनी अमृताची प्रेमकविता पूर्ण केली होती. त्याचे नाव होते ‘उसने जिस्म छोड़ा है, साथ नहीं’.
SL/KA/SL
22 Dec. 2023