प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन

 प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन

मुंबई, दि. १४ : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. १९४०-५० च्या दशकातील त्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. साधेपणा आणि प्रभावी अभिनय यामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यांना श्रावण, विदूर, राहुल अशी तीन मुले आहेत.

कामिनी कौशल यांनी शहीद (Shaheed,), नदीया के पार, शबनम, आरजू और बिराज बहू, दो भाई, जिद्दी, शबनम, पारस, नमूना, झांझर, आब्रू, बडे सरकार, जेलर आणि नाईट क्लब (Night Club) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि राज कपूर (Raj Kapoor) यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. दिलीप कुमार यांच्या बरोबर त्यांची पडद्यावरची जोडी खूप गाजली.

कामिनी कौशल यांचे मूळ नाव उमा कश्यप (Uma Kashyap). त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२७ रोजी लाहोर (Lahore) येथे झाला. त्यांचे वडील, प्राध्यापक शिवराम कश्यप, लाहोर येथील पंजाब विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक होते. कामिनी सात वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहान वयातच त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी कार्यक्रम सुरू केले. त्यांना मासिक १० रुपये पगार मिळत होता. त्यांनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात (English Literature)बीए (ऑनर्स) पदवी मिळवली. १९४६ मध्ये चेतन आनंद (filmmaker Chetan Anand)यांनी त्यांना नीचा नगर’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात पुरस्कार (Cannes Film Festival) मिळाला होता. चेतन आनंद यांनीच त्याचे कामिनी कौशल असे नामकरण केले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *