फळ विमा योजनेसाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र…

मुंबई दि १० — प्रत्येक गावात वेगळे हवामान अंदाज केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूच्या वीस किलोमीटर परिसरातील हवामानाचा अंदाज त्यात दिसून येईल त्यातून फळ विमा योजनेला आवश्यक निकष लागू करणे सोपे होईल अशी माहिती कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली, याबाबची लक्षवेधी सूचना रोहित पाटील यांनी उपस्थित केली होती, त्यावर हेमंत ओगले, अभिजित पाटील यांनी उपप्रश्न विचारले.
मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने विरोधी सदस्यांचं समाधान होत नव्हतं त्यामुळे ते आक्रमक झाले होते. पीठासन अधिकारी समीर कुणावार यांनी हस्तक्षेप करत मंत्री कोकाटे यांना पुन्हा उत्तर देण्यास सांगितलं, ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाल्याची तक्रार केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती मंत्री कोकाटे यांनी दिली. अधिक समाधान होण्यासाठी त्यांची बैठक घेण्यात येईल असं आश्र्वासित केलं.
शेतकऱ्यांना आता जुनी पीक विमा योजना
एक रुपयात विमा या योजनेत विमा कंपन्यांना सुमारे साडे सात हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे, त्या मानाने शेतकऱ्यांना हवा तसा लाभ मिळाला नाही त्यामुळे पुन्हा जुनी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे अशी माहिती कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली, याबाबची लक्षवेधी सूचना राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती, त्यावर रोहित पवार यांनी उप प्रश्न विचारले.
जुन्या विमा योजनेमुळे साधारण पणे साडे चार ते पाच हजार कोटी रुपये वाचणार आहे, त्यातून सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांची कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे, सध्या साडे सातशे कोटी रुपयांची निविदा विमा कंपन्यांकडून आली आहे अशी माहिती देखील मंत्री कोकाटे यांनी दिली. ML/ML/MS