फलटण, महिला डॉक्टरची आत्महत्या फसवणूक आणि शारीरिक शोषणामुळेच
नागपूर दि ९ : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी अटकेत असणारा संबंधित पोलिस अधिकारीच जबाबदार असून , त्यानेच तिचे शारीरिक शोषण आणि फसवणूक केल्याचे आजवरच्या तपासात उघडकीस आलं आहे, तिच्या हातावरील हस्ताक्षर तिचंच आहे आणि गळफास लावून घेऊनच ती आत्महत्या झाली असल्याचं ही तपासात निष्पन्न झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधीच्या प्रश्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली.
याबाबतचा प्रश्न अमित साटम यांनी उपस्थित केला होता त्यावर विजय वडेट्टीवार , प्रकाश सोळंके, ज्योती गायकवाड आदींनी उपप्रश्न विचारले. या आत्महत्येबद्दल उपस्थित केलेल्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू आहे, त्यात काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही बाब दुर्दैवी आहे. सर्व बाबी लाडकी बहीण योजनेशी जोडणं देखील चुकीचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षेची गरज आहे, केंद्र सरकारच्या नवीन कायद्यात अधिक कडक शिक्षा होणार आहे, या आत्महत्या महिलेच्या कुटुंबियांना सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, याबाबतचे आरोपपत्र लवकरच दाखल करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.ML/ML/MS