फलटणमधील डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पोलिस अधिकारी निलंबित…
सातारा दि २४ – फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पीएसआय गोपाल बदने यांना निलंबित करण्यात आले आहे. फरारी पीएसआय आणि दुसरा आरोपी बनकर याच्या अटकेसाठी पथकेदेखील रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी फलटणमधील एका हॉटेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या डॉक्टर महिलेच्या डाव्या हातावर सुसाईड नोट असून फलटणचे पीएसआय गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केला असून प्रशांत बनकर यांने मानसिक त्रास दिला अशा प्रकारचं लिहिलेले आहे.
दरम्यान आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे.
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याप्रकरणी फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि अन्य व्यक्तीं विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नातेवाईकांच्या सुचनेनुसार पोस्टमार्टेम सातारा इथे करण्यात आले. या घटनेतील पीएसआय गोपाल बदने यास निलंबित करण्यात आले असून आरोपींना शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत असेही पोलीस अधीक्षक दोशी यांनी स्पष्ट केले.ML/ML/MS