निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती, सत्तारांवर गुन्हा

छ संभाजी नगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शकरलाल शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी दाखल केली होती याचिकेनुसार निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. False information in election affidavit, crime against sattars
अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या 2014 आणि 2019 सिल्लोड , सोयगाव विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेतकीय जमीन , बिगर शेतकीय जमीन , वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शिक्षण विषयी खोटी माहिती दिली होती असे सिल्लोड न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस तपासात कृषी मंत्र्यांनी प्रकरणात तब्बल दोन वेळेस पोलिसांवर दबाव आणला होता. मात्र तक्रारदार यांच्या युक्तिवादा नंतर सिल्लोड न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस तपासाचे आदेश केले होते.
पोलीस तपासात अब्दुल सत्तार यांचा जबाब व निवडणूक शपथपत्रात नमूद केलेली माहिती यात मोठी तफावत असल्याचा युक्तिवाद प्रतिवादी यांनी न्यायालयात सादर केला होता. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दि. 10/07/2023 रोजी त्यांचे म्हणणे सादर करायचा अर्ज सदर प्रकरणात दिला होता. मात्र न्यायालयाने तो नामंजूर करून आरोपी क्र 1 म्हणजे सत्तार यांच्या विरुद्ध प्रोसेस जारी केले आहे.
लोकप्रतिनिधी कायदा कलम 125अ अनुसार आरोपी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रोसेस जारी करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रात
मंत्रिमंडळ विस्तार चालू असताना अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा मोठा झटका मानण्यात येत आहे.
याचिकेमध्ये मनोज गंगाराम मोरेल्लु व अजबराव पाटीलबा मानकर हे साक्षीदार आहेत. पुढील कायदेशीर न्यायालयीन लढाई जिंकण्याचा पूर्ण विश्वास महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरदास यांनी व्यक्त केला आहे.
ML/KA/PGB
13 July 2023