ठाण्यात बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश
ठाणे, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. Fake currency business busted in Thane
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम शर्मा (५२) आणि राजेंद्र राऊत (५५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पालघरचे रहिवासी आहेत.
या आरोपींनी २ हजार रुपयांच्या भारतीय चलनी नोटा स्वतः छापल्या असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. आरोपींकडून अशा नोटांची ४०० बंडल्स जप्त करण्यात आली. पोलीसांची एक या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्ट्रीचा तपास करत आहेत.
आरोपींवर भारतीय दंड विधान संहितेच्या ४८९ (ए), ४८९ (बी), ४८९ (सी) आणि ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SL/KA/SL
12 Nov. 2022