कोरोनानंतर मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत नापासांचा आकडा वाढला
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाच्या काळात ऑनलाईन परीक्षा घेतल्या गेल्याने ऑफ लाईन परीक्षांची सवय राहीली नसल्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतल्या गेलेल्या आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या पदवी परीक्षांमध्ये नापासांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २ वर्षात ऑन लाईन परीक्षेत नोव्हेंबरमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पास होणाऱ्यांचे प्रमाण साधारण ९० टक्के होते ते आता घेण्यात आलेल्या ऑफ लाइन परीक्षेत घसरून थेट ३३ ते ३५ टक्यांवर आले आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये बीकॉम च्या परीक्षेला बसलेल्या ६१ हजार १०७ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. म्हणजेच फक्त ३६ टक्के कॉमर्स पदवीधर पास झाले आहेत. तर बीए च्या शेवटच्या वर्षाचे ६६.५ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. यंदाच्या निकालात ६५ टक्के विद्यार्थ्यांना केटी लागली आहे.
लिखाणाची सवय मोडल्यामुळे नापासांचे प्रमाण वाढल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.
SL/KA/SL
18 April 2023