चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

 चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी

पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने नाना काटे यांनी आपला उमेदवारी दाखल केली असली तरी राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने आघाडीतच बिघाडी झाली आहे.

नाना काटे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार हे आज सहभागी झाले होते. यावेळी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी आज काटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

कलाटे यांची नाराजी

शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होती , कलाटे हे २०१४ साली शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते तर २०१९ साली जागा भाजपा कडे गेल्यावर ते काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना यांच्या पाठिंब्यावर अपक्ष लढले होते, त्यांना एक लाख बारा हजार मते मिळाली तर दिवंगत लक्ष्मण जगताप यांना एक लाख एकोणप न्नास हजार मते मिळाली होती.

याच कामगिरीवर कलाटे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली होती मात्र ती राष्ट्रवादीच्या काटे यांना गेल्याने कलाटेनी बंडखोरी केली आहे.

ML/KA/SL

7 Feb. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *