फडणवीस यांनी घेतले ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन

पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद बेंगरुट आदी उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे उद्या सकाळी सासवडकडे प्रस्थान होणार आहे. Fadnavis took darshan of the feet of Dnyaneshwar Maharaj
ML/ML/PGB
1 July 2024