फडणवीसांनी घेतली दिवंगत धानोरकरांच्या कुटुंबीयांची भेट

Fadnavis met the family members of late Dhanorkar
चंद्रपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे नुकतेच निधन झाले. वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी आज दुपारी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळूभाऊंना आदरांजली वाहिली. त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
ML/KA/SL
5 June 2023