फडणवीसांनी सात वरिष्ठ नेत्यांना दिल्या पाच वेगवेगळ्या मूर्ती भेट
नवी दिल्ली, दि १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये दिल्लीत सात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत त्यांना पाच वेगवेगळ्या मूर्ती भेटी देऊन महाराष्ट्रीय संस्कृतीचे दिल्लीत अनोखे दर्शन घडविले.
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर काल आणि आज पहिलाच दिल्ली दौरा होता त्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सात नेत्यांचा समावेश होता.
– त्यांनी एकूण 7 नेत्यांच्या घेतल्या भेटी
- 5 निरनिराळ्या मूर्ती देऊन घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
– राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना दिली विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती
– पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली छत्रपती शिवरायांची मूर्ती
– केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली वीर सावरकरांची मूर्ती
- भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिली गाय-वासराची मूर्ती
- केंद्रीय मंत्री राजनाथसिंग आणि नितीन गडकरींना दिली सिद्धीविनायकाची मूर्ती.
ML/ML/SL
12 Dec. 2024