कोयासन विद्यापीठातर्फे फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली आहे.
कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते, तसेच यावेळी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.
2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर 2018 आणि 2023 मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती. Fadnavis conferred honorary doctorate by Koyasan University
ML/KA/PGB
26 Dec 2023