भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचा फडणवीसानी केला निषेध

 भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचा फडणवीसानी केला निषेध

नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महात्मा गांधी सारख्या स्वातंत्र्य लढ्यातील महानायकावर टीका करणे हे कुठल्याही प्रकारे उचित नाही शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजी यांनी गांधींच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो या विरोधात उचित अशी कारवाई करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलतांना दिलं Fadnavis condemned Bhide Guruji’s statement.

कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काही कारण नाही.

ज्या पद्धतीने या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल गल्लीछ शब्दात राहुल गांधी बोलतात. त्याचाही निषेध कॉंग्रेसवाल्यानी केला पाहिजे, त्यावेळी मात्र ते मिंधे होतात. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधीचा अपमान सहन केला जाणार नाही. असेही फडणवीस म्हणाले.

ML/KA/PGB
30 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *