फडणवीसांनी जाहीर केली श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी

नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजपा सहित उभे राहून , श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील असे आज भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त नागपुरातील टिळक पुतळा येथे आयोजित कार्यक्रमात संबोधित केल्यानंतर पत्रकार पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
भारतीय जनता पक्ष हा देशातातील सर्वात मोठा सदस्य असलेला त्याचप्रमाणे सर्वात जास्त स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार असणारा पक्ष आहे. या पक्षात कधीच फूट पडली नाही कारण या पक्षाचे कार्यकर्ते हे आत्मकेंद्रीत नाही असं त्यांनी पक्षस्थापना दिनाप्रसंगी संबोधित करताना सांगितलं. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजप मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यख बंटी कुकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ML/ML/SL
6 April 2024