मुंबई पालिकेच्या ठेवींमधल्या साडे सहाशे कोटींची उधळपट्टी

 मुंबई पालिकेच्या ठेवींमधल्या साडे सहाशे कोटींची उधळपट्टी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेच्या निवडणुका पावसा प्रमाणे लांबत चालल्या असून विकासाच्या नावावर सतत उधळपट्टी सुरू आहे, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहोत अशी घोषणा उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.Extravagance of six and a half crores in the deposits of Mumbai Corporation

मुंबई महापालिका एकेकाळी साडे सातशे कोटींच्या तुटीमध्ये होती , मात्र आमच्या सहकार्याने आता तिच्या ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत असे ठाकरे यांनी सेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. याच ठेवीतील सुमारे साडे सहाशे कोटींची उधळपट्टी सध्या विविध कामांच्या नावावर केली जात आहे. त्यासोबतच एकूण सुमारे नऊ हजार कोटींची उधळपट्टी करण्यात आल्याची आपली माहिती आहे . याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी कोणीच नाही म्हणून आम्ही तो विचारणार आहोत यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक जुलै रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबाच आहे, मात्र कोणाला तरी घाबरवण्यासाठी त्याचा प्रचार केला जातो आहे असा आरोप त्यांनी केला. मात्र त्याआधी देशभरात गोवंश हत्या बंदी लागू करा अशी मागणी त्यांनी केली. मला अर्धवटराव म्हणणारे फडणवीस काय दिल्लीचे नावडाबाई आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी यावेळी केला.

ML/KA/PGB
20 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *