आधार-पॅन लिंकसाठी मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरत्या आर्थिक वर्षांमध्ये कर भरण्याच्या गडबडीत असलेल्या करदात्यांसाठी केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत आता तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत असलेली मुदत आता ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
पॅन कार्ड-आधार कार्डचे स्टेट्स कसं तपासायचं?
- यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत सरकारी वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जाणे आवश्यक आहे.
- येथे गेल्यानंतर आधार सर्विसेजचा मेन्यू तुम्हाला दिसेल. यावर क्लिक करा. त्यानंतर स्टेट्सवर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकावे लागेल. त्या ठिकाणी असलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- या नंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिकिंगचे स्टेट्स चेक करण्यासाठी Get Linking Status वर क्लिक करणे गरजेचे आहे.
- या नंतर तुम्हाला अवघ्या काही मिनिटामध्ये लिंकिंगची माहिती मिळू शकते की, तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक झाले की नाही.
SL/KA/SL
28 March 2023