बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ, विलंब शुल्क भरावे लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.यावर्षी बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत 8 ते 10 दिवस अगोदरच सुरू होणार आहेत. या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा ही 11 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.राज्य मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल.