ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याची मुदत वाढवा
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तथापी सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. Extend the deadline for filing Gram Panchayat election applications
अर्ज भरण्याची मुदत उद्या २ डिसेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष होण्यास बाधा येण्याची शक्यता आहे असे पत्र आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांना दिले आहे.
आयोगाने उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास परवानगी देण्याचा आदेश आज तातडीने कार्यालयीन कामकाज सुरु होईपर्यंत द्यावा तसेच आयोगाच्या सर्व्हरमधील समस्येमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात झालेली अडचण ध्यानात घेता अर्ज भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवून ३ डिसेंबर २०२२ पर्यंत करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
ML/KA/SL
1 Dec. 2022