आयुध निर्माण कारखान्यात स्फोट, आठ ठार, सात गंभीर जखमी

भंडारा, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ तसंच नागपूर महानगरपालिकेचा चमू दाखल झाला आहे. संरक्षण दलासोबतच जिल्हा प्रशासनही समन्वयानं मदतकार्यात सहभागी झालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या कंपनीत दारुगोळा निर्मितीचं काम केलं जातं. सकाळी ११ च्या सुमाराला LTCE – 23 या इमारतीत झालेल्या या स्फोटात इमारत पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या स्फोटामुळे अंदाजे १० किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसले.
सकाळी 11 वाजेच्या सुमारास LTCE 23 या इमारतीमध्ये स्फोट झाले. त्यामुळे इमारत पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे. सकाळी इमारतीमध्ये पहिल्या शिफ्टचे लोक काम करत असताना हा स्पोट झालेला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटामुळे दहा किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसलेत. या कंपनीत दारू गोळा निर्मितीचे कार्य होते. या स्फोटात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ML/ML/SL
24 Jan. 2025