राणी बागेत उभारण्यात येणार ‘विदेशी प्राणी विभाग’
मुंबई, दि. ९ : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयांच्या १० एकर जागेवर लवकरच ‘विदेशी प्राणी विभाग’उभारण्यात येणार आहे. यामध्ये १८ दुर्मिळ आणि विदेशी प्रजातींसाठी आधुनिक निवाऱ्यांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये पांढरा सिंह, चित्ता, लिंबूर, झेब्रा यांसारख्या प्राण्यांचा समावेश असणार आहे. यासाठी पालिका अंदाजित ४९८ कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली असून येत्या जानेवारी २०२६ पासून या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. तर या विभागाची संकल्पना थायलंडमधील एचकेएस कन्सल्टंट या कंपनीने तयार केली आहे.
विदेशी प्राणी विभागामध्ये ऑस्ट्रेलियन, अमेरिकन आणि आफ्रिकन असे तीन विभाग असणार आहेत. या विभागात १७ स्वतंत्र प्राणी अधिवास करणार आहेत.
SL/ML/SL